व्हीएसआरएस न्युज चिंचवड -आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आचरण केल्यास सर्व व्यक्ती सुदृढ, निरोगी असे दिर्घायूष्य जगू शकतात. असे प्रतिपादन पुणे आयुष विभागाचे सहसंचालक आणि ससुन रुग्णालय आयुर्वेद विभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. व्यंकट धर्माधिकारी यांनी केले.
या उद्घाटन प्रसंगी लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. श्रीकृष्ण जोशी, डॉ. काळे, डॉ. जयकुमार ताम्हाणे, डॉ. संतोष सूर्यवंशी, निमा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सुहास जाधव, डॉ. विलास जाधव, आयुर मास्टर्स व्यवस्थापक निनाद नाईक, डॉ. निलेश लोंढे, डॉ. श्यामसुंदर जगताप, डॉ. विशाल क्षिरसागर, रिसर्च विभाग प्रमुख गायत्री गणू आदी उपस्थित होते.
सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुसज्ज ओपीडी, पंचकर्म, आंतररुग्ण विभाग, आयुर्वेदिक मेडिकल, आयुर्वेदिक मॉल मध्ये लाकडीघाणा, तेल, तूप, मध, सैंधव, केमिकल फ्री सौन्दर्य प्रसाधने, सेंद्रिय उत्पादने उपलब्ध आहेत तसेच क्षारसूत्र, उत्तरबस्ती व इतर आयुर्वेदिक शस्त्रक्रियासाठी सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सुसज्ज लॅबोरेटरी, एक्स रे, सिटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी या सुविधा देखील आहेत.
या कार्यक्रमप्रसंगी स्वागत डॉ. निलेश लोंढे, सूत्र संचालन संजय रुईकर यांनी केले तर आभार डॉ. शामसुंदर जगताप यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.
Discussion about this post