व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातील 72 नवीन कोरोना रुग्णांची आज सोमवारी नोंद झाली.
कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुगणाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 625 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 3 66 752 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1279सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1271 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
आकुर्डी भागात ताप येणे, थंडी वाजून येणे, अंग दुखणे, डोके दुखणे आदी साथींचे आजार डेंग्यू (Dengue), मलेरिया, स्वाईन फ्लू या आजारांचा फैलाव परिसरात होऊ नये. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औषध फवारणी व धूर फवारणी करावी अशी मागणी नागरिक कडुन होत आहे.
राज्यात आज 785 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 937 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे.
राज्यात आज सहा कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,72,444 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.98 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात एकूण 14534 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 4989 इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 1826 सक्रिय रुग्ण आहेत.
Discussion about this post