व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. इथं कुणी पालकमंत्री झाला, कुणी मंत्री झाला, कुणी संत्री झाला, तरी काही फरक पडत नाही अशी टीका आमदार सुनील शेळके यांनी केली.
ते म्हणाले की, पुणे जिल्हा हा पवारांचा जिल्हा आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला देखील माहीत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पवारांचं असलेलं योगदान हे कुणी कदापि विसरू शकत नाही. त्यामुळे इथं कुणी पालकमंत्री झाला, कुणी मंत्री झाला, कुणी संत्री झाला, तरी काही फरक पडत नाही.
अनेक वर्षापासून पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी राजकीय ताकद आहे. सध्या सत्तेत असलेल्या शिदे-फडणवीस सरकारमध्ये पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार अशी चर्चा आहे. पुणे जिल्ह्यात आगामी काळात पुणे – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, जिल्ह्यातील साखर कारखाने आदींच्या निवडणुका आहेत.
Discussion about this post