व्हीएसआरएस मराठी न्युज -पावसाळ्याच्या कालावधीत डासांची उत्त्पत्ती होण्यास पोषक वातावरण असते. डासांमुळे हिवताप, डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे आजार पसरतात. हिवताप हा आजार पसरविण्यास अनॉफिलस डास तर, डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे आजार पसरविण्यास एडिस इजिप्ताय हे डास कारणीभूत ठरतात.
अंतर्गत रस्त्यावर घाण करणार्या, कचरा रस्त्यावर टाकणार्या नागरिकांवर आरोग्य विभागाच्या ग्रीन मार्शल पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्या दंडाच्या रक्कमेत आयुक्त राजेश पाटील यांनी मोठी वाढ केली आहे.
हिवताप, डेंग्यू किंवा चिकुनगुनिया झालेल्या व्यक्तीस डास चावला तर रोग्याच्या रक्तातील हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनियाचे विषाणु त्या डासाच्या शरीरात शिरतात. असा विषाणुजन्य डास निरोगी माणसाला चावल्यास त्याला हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या रोगाचा प्रसार थांबवायचा असल्यास एनॉफिलस व एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालावा लागेल. एनॉफिलस अस्वच्छ व एडिस डासाची मादी घरात साठलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालते.
महापालिकेकडून दक्षता घेण्याचे आवाहन
पाणी साठविण्याच्या सर्व भांड्यातील पाणी वापरुन रिकामी करुन घासून/ पुसून कोरडी करावी. त्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावे. घरातील ज्या मोठ्या पाण्याच्या टाक्या रिकाम्या करता येणार नाहीत त्यांना घट्ट झाकण बसवावे. घरातील फ्लॉवरपॉट, कुलर, फ्रिजखालील ट्रेमधील पाणी दर आठवड्यास रिकामे करावे.
घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावावी. घराभोवती पाण्याची डबकी असतील तर ती बुजविणे किंवा संबंधित ठिकाणी पाणी वाहते केले जाईल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.
Discussion about this post