व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -चिंचवड महापालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच सर्व खासगी शाळा (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित) अशा सर्व शाळांना आज (बुधवारी) आणि उद्या (गुरुवारी) सुट्टी जाहीर.
मागील चार दिवसांपासून पिंपरी – चिंचवड शहरात पाऊस वाढला आहे. जोरात पाऊस कोसळत आहे. सगळीकडे पाणीच-पाणी झाले आहे. आणखी काही दिवस जोराचा पाऊस राहणार आहे. रेड अलर्टही दिला आहे. येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
शाळांना आज (बुधवारी) आणि उद्या (गुरुवारी) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिले आहेत.
Discussion about this post