व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना एका 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलेला अनेक दुर्धर आजार होते, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य विभागाने दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना एका 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलेला अनेक दुर्धर आजार होते, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य विभागाने दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात बारा दिवसात H3N2 व्हायरसचा हा दुसरा बळी ठरला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या जवळपास H3N2 व्हायरस बाधित 17 रुग्ण आहे. मात्र दिलासादायक बातमी अशी आहे की फक्त एका रुग्णावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तर उर्वरित रुग्ण आहे आपल्या घरात विलगिकरण करुन उपचार घेत आहेत.
गर्दीच्या ठिकाणी टाळावे. मास्कचा वापर करावा असे आवाहन सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफने यांनी केले.
Discussion about this post