व्हीएसआरएस मराठी न्युज -BVG लाईफ सायन्सेस लिमिटेड व शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमानेमोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.प्रभागातील २२० ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हभप किसन महाराज चौधरी,सा.कार्यकर्ते महेश काटे,संघाचे कार्याध्यक्ष आबा गायकवाड,उपाध्यक्ष किसन देशमुख, अण्णा अभंग,नारायण भुजबळ, आत्माराम भुवड,लक्ष्मण थोरात व इतर पदाधिकारी उपस्थित होते.डॉ. अर्चना शिंदे,डॉ.गौरव पठारे,डॉ.मृण्मयी हेडाऊकर यांनी तपासणी व समुपदेशन केले.सा.कार्यकर्ते मंगेश कुटे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
Discussion about this post