व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:- दि.२४ एस के लाॅन्स समोरील जुनी ड्रीनेज लाईन वारंवार तुंबत असल्याने व त्या पासून तेथील रहिवाश्यांना तुंबलेल्या ड्रीनेज लाईनमुळे समस्या उदभवत असल्याने आळंदी नगरपरिषदेत
मुख्याधिकारी यांच्या नावे त्यांनी १८ मे ला निवेदन दिले. वेळोवेळी ड्रीनेज तुंबलेली घाण बाहेर काढून सुद्धा परत ड्रीनेज लाईन वारंवार तुंबत आहे.
आळंदी येथील स्टेट बँक लगतचे मागील बाजूस एस के लाॅन्स ते पश्चिमेस जोगळेकर निवास परिसरातील रहिवासी आहोत.सदर परिसरामध्ये सुमारे २५ वर्षापूर्वी ड्रीनेज लाईन आणि चेंबर्स अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहे.बांधकाम अंशतः ढासळलेले काही चेंबर्स आणि जुनी झालेली ड्रेनेज पाईप लाईन
वारंवार मोठया प्रमाणात तुंबत असते.सध्या संबंधित ड्रेनेज पाईपद्वारे निर्गत होणारे सांडपाणी,मैलापाणी मोठ्या प्रमाणात तुंबत असल्याने साहजिकच शौचालये तुंबण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच काही ठिकाणी तुंबलेले सांडपाणी ,मैलापाणी जमिनीवर साठल्याने दुर्गंधी पसरून डासांची उत्पत्ती व उपद्रव वाढला आहे.अशा परिस्थितीत परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन
प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आगामी काही दिवसांत लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने वरील परिस्थितीचा आपण गांभीर्याने विचार करून आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी लवकरात लवकर नवीन ड्रेनेजलाईन टाकण्याची कार्यवाही ही अपेक्षा आहे. तरी नवीन ड्रेनेज पाईप कामाची पूर्तता होईपर्यंत पावसाळा सुरू होण्या पूर्वीच अस्तित्वातली संपूर्ण ड्रेनेज लाईन
तातडीने व युद्ध पातळीवर प्रवाहीत करण्याची कार्यवाही व्हावी.अशी मागणी या निवेदनात
तेथील मारुती जाधव,गोपाळ फुलसरे,गणेश जाधव,हेमंत साबळे,अरविंद अंकली व ईतर तेथील रहिवाश्यांनी केली आहे.
ह्या पंचवार्षिक लाच येथील नव्याने रस्ता झालेला आहे व नवीन ड्रीनेज लाईन ही टाकण्यात आली आहे.जुनी व नवीन या दोन्ही ड्रीनेज लाईन वारंवार काही भागात तुंबत आहेत.त्या भागातील काही ड्रीनेज पाईपलाईनीचे
नव्याने व्यवस्थितपणे काम केले तर तेथील समस्या सुटेल.अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर काळूराम कुऱ्हाडे यांनी दिली.
Discussion about this post