व्हीएसआरएस मराठी न्युज –निगडी : “तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे” या लोकप्रिय गीताच्या गायिका कडूबाई खरात यांच्या गायनाने निगडीकर आनंदीत झाले.
उत्तम संगीत संयोजन आणि ढोल-ढोलकच्या उत्कृष्ट साथसंगतीने तरुणांना ठेका धरायला भाग पाडले. कडूबाई खरातांच्या प्रत्येक गाण्यांवर तरुणांनी जल्लोष केला. भीम अनुयायांनीही प्रत्येक गाण्याला दाद देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त निगडी, से.२२ येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने दि.२३ मे २०२२ रोजी से.२२ मधील काळभोर गोठा येथे सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या भीमगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, छ.शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच जयंती उत्सव समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
भीम गीतांचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निगडी, सेक्टर क्र.२२ मधील तरुणांनी हिरहिरीने सहभाग घेतला होता. परिसरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
Discussion about this post