व्हीएसआरएस मराठी न्युज – कुदळवाडी येथे रिगल रेसीडेन्सी येथे लहान मुलांचे लसीकरण मोहीम शिबिर आयोजित करण्यात आली होती.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग यांच्या तर्फे आपल्या परिसरातील सर्व सोसायट्यांमधील 0 ते 5 वर्ष वयाच्या ज्या मुलांचे नियमीत लसीकरण ( POLIO, BCG, ROTAVIRUS, PENTA ,MR, VIT-A , DPT, HEP-B ) हे बाकी आहे ते पूर्ण करून घ्यावे, हे पूर्ण करण्याची मोहीम पिंपरी चिंचवड मनपाच्या वैधकीय विभागा मार्फत घेण्यात येत आहे,
आपल्या कोणत्याही सोसायट्यांमधील 0 ते 5 वर्ष वयाच्या मुलाचे वरील पैकी कोणतेही लसीकरण बाकी असेल तर ते करून घ्यावे ,त्यासाठी पिंपरी चिंचवड मनपाच्या वैधकीय विभागा तर्फे आपल्या सर्व सोसायट्यांमध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील लहान मुलांचे सर्वेक्षण चालू आहे तरी पिं. चि. मनपा ला सहकार्य करावे .
आपल्या कोणत्याही सोसायटीमध्ये वरील वयोगटातील 25 पेक्षा जास्त लहान मुले ह्या लसीकरणापासून वंचित असतील पिंपरी चिंचवड मनपा तर्फे त्या सोसायटीमध्ये लसीकरण शिबीर घेण्यात येईल.
यावेळी उपस्थित धनंजय जगताप यांनी सोसायटी वतीने उपस्थित डॉक्टर चा व दिनेश यादव यांच्या सन्मान केला.
Discussion about this post