व्हीएसआरएस मराठी न्युज –चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमधील प्रवाशांना विषबाधा झाली असल्याचे समजते.
या प्रवाशांच्या औषधोपचारासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर व्यवस्था करण्यात आली असून तसेच ससून रुग्णालयातदेखील प्रवाशांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान ४० प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
याघटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या भारत गौरव यात्रा रेल्वेगाडीमध्ये काही प्रवाशांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे या प्रवाशांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्यरात्रीच्या दरम्यान ही विशेष रेल्वे गाडी पुणे रेल्वे स्टेशनला आली होती. तेव्हा प्लॅटफॉर्मवरच विषबाधा झालेल्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर विषबाधा झालेल्या प्रवाशांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. ससून रुग्णालय प्रशासनाला ४० बेड तयार ठेवण्यास सांगण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
Discussion about this post