व्हीएसआरएस मराठी न्युज-आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:दि.१८ आळंदी मधील लक्ष्मी माता चौका मध्ये नगरपालिकेने ७ दिवसांपूर्वी पाईपलाईन दुरुस्ती साठी खड्डा जेसीबी च्या सहाय्याने
केला गेला आहे.तो खड्डा फुटपाथ वरच्या मधोमध कोपऱ्यावर असल्याने तेथून येणाऱ्या –जाणाऱ्या नागरिकांना विशेषतः लहान मुले,महिला,वृद्ध व्यक्ती ना फूटपाथ वरुन चालण्यासाठी अडसर व त्रासदायक ठरत आहे.
या चौकात रहदारीचे प्रमाण मोठे
असल्याने त्या खणलेल्या खड्ड्यामुळे व खड्ड्यातील माती काही प्रमाणात रस्त्यावर असल्याने नागरिक वाहतूक रहदारीच्या रस्त्यावरून चालतात.त्या खड्ड्यामुळे व रस्त्यावर आलेल्या काही माती मुळे एखादी दुर्घटना घडू शकते. तेथील काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी विश्व श्रीराम सेना समाजिक संगणक चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शन खाली मागणी व तेथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.
आषाढी वारी निमित्त पाणी नियोजन व पाण्याच्या वॉल दुरुस्ती चे तिथे काम चालू आहे.अजून काही दिवस त्या कामास पूर्ण होण्याकरिता वेळ लागणार आहे.त्या कामा संबंधित असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांकडून असे सांगण्यात आले.
माऊली पार्क येथे वाघमारे निवसा समोरील पथदिवा अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे.
तसेच अनेक दिवसांपासून घुंडरे आळी मध्ये हरणाई निवास समोरील खांबावरील लाईट बंद अवस्थेत आहे.
त्या दुरुस्ती करिता सोशल मीडिया मार्फत सामाजिक काम करणाऱ्या ग्रुपवर तेफोटो व्हायरल होत आहेत. यावरून लक्षात येते की पालिकेचे गल्ली बोळातील बंद असलेल्या पथदिव्यांवरती दुर्लक्ष झाले आहे.
Discussion about this post