व्हीएसआरएस मराठी न्युज –देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि स्वच्छतेसाठी युवकांसह नागरिकांनी पुढाकार घ्यावा, या हेतूने केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग सीजन २ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सफाई मित्र सुरक्षा शिबीर! स्केटिंग ग्राउंड डॉ. हेडगेवार क्रीडासंकुल मासुळकर कॉलनी, अजमेरा येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने इंडियन स्वच्छता लीग २.०, स्वच्छता पंधरवडा अंतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आरोग्य तपासणी व स्वच्छतेबाबत शपथ घेण्यात आली.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त श्री. यशवंत डांगे, आरोग्य कार्यकारी अधिकारी श्री. गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी श्री.आण्णा बोदडे, श्री. सिताराम बहुरे, श्रीम. सुचिता पानसरे, श्री. राजेश आगळे, जनता संपर्क अधिकारी श्री. प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
या स्वच्छता लीगमधे स्वच्छतेद्वारे समाजाची सेवा करणाऱ्या सफाईमित्रांसाठी सेवा व सुरक्षा शिबीर आयोजीत केले जाणार आहे. पर्यटन स्थळे,टेकड्या, शहराची मुख्य ठिकाणे तरुणांच्या सहभागाने विविध संघांच्या माध्यमातुन स्वच्छ करणे,शहराच्या स्वच्छतेसाठी तरुणाईचा सहभाग वाढविणे,MyGov App च्या माध्यमातुन नोंदणी मोहीम राबविणे इत्यादी कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
Discussion about this post