व्हीएसआरएस मराठी न्युज –जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुढील जून महिन्यामध्ये साजरा होणार आहे. पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात असतो. पालखी सोहळ्यानिमित्त उपाययोजना करण्याची मागणी विठ्ठल प्रतिष्ठाने केली आहे.
यंदाच्या वर्षी पहिला मुक्काम (ता. ११) जून रोजी असणार आहे. त्याकरता आवश्यक असणारे पालखी मार्ग मधील स्थापत्य विषयक कामे हाती घ्यावी. दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविक भक्त यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था महापालिकेने करावी. तसेच, जागोजागी पिण्याच्या पाण्याची व वापरण्याच्या पाण्याची सोय करावी. फिरते शौचालयाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. पालखी सोहळा दरम्यान वारकरी भाविकांसाठी सर्वच ठिकाणी आरोग्य विषयक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात, पालखी मार्ग मधील अडचणी लक्षात घेता तेथील अतिक्रमण त्वरित हटवावीत. अशी मागणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल दळवी यांनी केली आहे.
Discussion about this post