व्हीएसआरएस मराठी न्युज –माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार व त्यांच्या उपस्थितीत या आपत्कालीन दुःखद परिस्थितीत राजकारण न करता आपली सामाजिक बांधिलकी व कर्तव्य बजावत युवककाँग्रेस च्या वतीने १,२५,०००/- सव्वा लाख रू. ची अत्यावश्यक औषधी रुग्णालयाचे अधिष्ठाता रामेश्वर वाकोडे यांच्याकडे देण्यात आली.
याप्रसंगी आ. मोहन अण्णा हंबर्डे, अभ्यागत मंडळाचे सदस्य संतोष पांडागळे, नांदेड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल पावडे, तालुकाध्यक्ष श्याम कोकाटे, प्रदेश सचिव अतुल पेद्देवाड, जिल्हा उपाध्यक्ष राहुल देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष सतिश बस्वदे, युवा नेते जयसिंग हंबर्डे, राहुल हंबर्डे, एनएसयुआय चे अध्यक्ष शशिकांत क्षिरसागर, अब्दुल हबीब, राजू हंबर्डे, संतोष जानापुरीकर, व उत्तर विधानसभा उपाध्यक्ष निखिल चौधरी उपस्थित होते.
Discussion about this post