व्हीएसआरएस न्युज क्रीडा विभागाची कामगिरी बघता क्रीडा सभापती उत्तम केंदळे यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा विभागाची गाडी सुसाट धावताना दिसत आहे. क्रीडा संबंधित विविध विषय मार्गी लावले आहेत. आदर्श क्रीडा धोरणाची आखणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाची बैठक नुकतीच महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त यांच्या दालनात संपन्न झाली.
आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या नुकत्याच क्रीडा विभागाच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये क्रीडा विषयक पायाभूत सुविधा व खेळाडू घडवण्यासाठी मगर स्टेडियम येथे स्वतंत्र क्रीडा विभाग कार्यालय बांधण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार (खेळाडू, दिव्यांग खेळाडू व मार्गदर्शक) २०२१ क्रीडा पुरस्कार धोरण मसुदा तयार करण्यात आल्यामुळे देशातील राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय खेळाडू असो त्याला महानगरपालिकेच्या वतीने पुरस्कार दिला जाणार आहे.
यावेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे नियोजन ११ ते २२ डिसेंबर २०२१ या दहा दिवसाच्या दरम्यान करण्यात आलेले आहे. येणा सहा महिन्यात मुंबईच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये देशातील ३० संघ सहभागी होणार आहेत. जलतरण तलाव चालू व अद्यावत करण्यात येणार आहेत. दोन वर्षापासून स्पर्धा झालेल्या नाहीत, त्यामुळे दोन महिन्यात महापौर चषक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या खेळ सुविधा कार्यक्षमतेने चालू करून खेळाडू तयार करण्यात येणार आहेत.
Discussion about this post