व्हीएसआरएस न्युज शरद पवार नगर येथे कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी आमदार नीलेश लंके यांना ‘नीलेश तुझे राहणीमान साधे आहे हे दिसतेच, पण तू तुझे कुटुंबीय साध्या घरात, साध्या पद्धतीने राहता, हे मी ऐकून आहे.
मला आज तुझ्या कुटुंबीयांना भेटायचे आहे, ‘आपण तुझ्या घरी जाणार आहोत’ असे पवार यांनी आमदार लंके यांना सांगितले. आमदार लंके यांनी तातडीने हंगे येथील ग्रामस्थांशी, कार्यकर्त्यांशी संपर्क साधत शरद पवार यांच्या स्वागताची तयारी करण्यास सांगितले. शरद पवार गावात येणार हे समजल्यावर ग्रामस्थांची एकच घाई उडाली. फुलांचे आगार म्हणून हंगे गावाची ओळख आहे. त्यामुळे स्वागतासाठी पोत्यातून फुले आणण्यात आली. गावातील सनई पथकाची जुळवा जुळव करण्यात आली.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पवारांच्या वाहनांचा ताफा हंगे येथे आला. ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. पवार यांनी आमदार लंके यांच्या घराला भेट देत त्यांचे वडील ज्ञानदेव लंके, आई शकुंतलाबाई, पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्या राणी लंके, बंधू दीपक यांच्याशी मनमोकळी चर्चा केली.
Discussion about this post