व्हीएसआरएस न्युज चिखली-मिळालेल्या माहितीनुसार, मृत कानिफनाथ त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलासोबत रविवारी सकाळी चिखली परिसरात आले होते. त्यावेळी पिंपरीतून एक मारेकरी त्यांचा पाठलाग करत होता.
साने चौकाजवळ आल्यानंतर मारेकऱ्याने कानिफनाथ यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले. त्यानंतर डोक्यात दगड मारून निर्घृणपणे खून केला.
कानिफनाथ क्षीरसागर (रा. पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हा प्रकार साने चौकापासून सुमारे दोनशे मीटरच्या अंतरावर दाट लोकवस्तीच्या ठिकाणी घडला.
भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
Discussion about this post