व्हीएसआरएस न्युज पिंपरी मा मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिघी येथील ज्ञानदीप अनाथ आश्रमात धान्य वाटप करण्यात आले .
कोरोणाच्या काळामध्ये अनाथ आश्रमांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने सामाजिक कार्याचे भान मनामध्ये ठेवुन भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने भाजप शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम राबविण्यात आला.
महाराष्ट्र राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेश आण्णा टिळेकर ,शहर अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे, व आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप ओबीसी मोर्चा हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक चांगले व समाज उपयोगी उपक्रम राबवत असुन पुढेही अशी समाजहिताची कामे होत राहतील असे भाजप ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष ऋषिकेश भाऊ रासकर यांनी सांगितले .
ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस योगेश अकुलवार यांनी दिघी येथे कार्यक्रमाचे नियोजन केले होते यावेळी भोसरी विधानसभेचे दमदार आमदार महेशदादा लांडगे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख वीना सोनवलकर, नगरसेवक विकास डोळस, नगरसेविका निर्मलाताई गायकवाड, भाजप ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष ऋषिकेश भाऊ रासकर, सरचिटणीस योगेश अकुलवार, ओबीसी युवा मोर्चा संपर्क प्रमुख राजेश डोंगरे, शंकर लोंढे, शशिकांत पुंड, कुलदीप परांडे,उदय गायकवाड, संजय गायकवाड, ओबीसी महिला सरचिटणीस जयश्री देशमाने, सोनाताई गडदे, लता हिंदळेकर, आदी ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते
Discussion about this post