व्हीएसआरएस न्युज पिंपरी पिंपरी, ३१ ऑक्टोबर: पिंपरी चिंचवड बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. सचिन थोपटे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. निवडीनंतर थोपटे यांच्यावर संपूर्ण शहरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पिंपरी चिंचवड बार असोसिएशनची २०२० / २०२१ साठी पिंपरी मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील बाररुममध्ये शनिवारी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली. एकूण १४८० वकील मतदारांपैकी १०३२ मतदारांनी मतदान केले. त्यात एकूण ६९.७१ टक्के मतदान झाले. अध्यक्षपदासाठी एकूण चार उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे निवडणुकीला मोठी रंगत आली होती.
एक अनुभवी आणि सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व तसेच नव्या जुन्या सर्वांना सोबत घेवून आजवर काम करणारे अॅड. सचिन थोपटे यांच्या नावाला अनेक वकिलांनी पसंती दर्शविली होती. त्यामुळे जवळपास थोपटे यांचा विजय निश्चितच मानला जात होता. थोपटे यांच्यासोबत इतर सहकारी वकिलांनी देखील निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली होती. त्यामुळे थोपटे यांचा विजय अगदी सुकर झाला. हे यश माझे नसून सर्व सहकारी मित्रांचे आहे तसेच या पदाच्या माध्यमातून अधिक विधायक कामे करून अध्यक्षपदाला योग्य न्याय देण्याचे काम करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष:- ॲड. सचिन थोपटे, उपाध्यक्षः- ॲड. गौरव वांळुज, सचिवः – अॅड. निखिल बोडके, महिला सचिवः- ॲड.प्रियांका सुरवसे, सहसचिवः- अॅड. सुनील रानवडे, खजिनदार:- अॅड. अनील पवार, हिशेब तपासनीसः- अॅड. गोरख मकासरे, सदस्य:- अॅड. संतोषी काळभोर, अॅड. स्नेहा कांबळे, अॅड. मंगेश खराबे, अॅड. महेश मासुळकर, अॅड.सारिका मोरे, अॅड. ऐश्वर्या सिरसाठ.
Discussion about this post