व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी-प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड शहराच्या महिला अध्यक्षा सौ संगीता किशोर जोशी यांची पिंपरी विधानसभा संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्यपदी दुसऱ्यांदा निवड झाली.
पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष आनंद बनसोडे, किशोर जोशी आदी उपस्थित होते.
प्रहार अपंग क्रांती आंदोलन,घरकुल अपंंग सहाय्य संस्था तसेच शहरातील अपंग बांधवांच्या वतीने संगीता जोशी यांचे अभिनंदन करण्यात आले.
Discussion about this post