व्हीएसआरएस न्युज-बुधवार दि. १५ ते शुक्रवार दि १७ डिसेंबर दरम्यान असणार आहे.
त्यामध्ये बुधवार दि १५ डिसेंबर रोजी शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला आणि हडपसर मतदार संघाचा समावेश आहे. गुरुवार दि १६ डिसेंबर रोजी कसबा, पर्वती, कॅन्टोन्मेंट आणि वडगावशेरी या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीला मनसेचे शहर पदाधिकारी उपस्थित राहणार नाहीत. केवळ राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहेत. त्याचबरोबर शुक्रवार दि १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कोथरूड येथे राज ठाकरे सर्व आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांची बैठक घेणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.
शहरातील सर्व विभागातील पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या दौऱ्यावर पुण्यात येणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष वसंत मोरे, सरचिटणीस किशोर शिंदे, शहराध्यक्षा वनिता वागसकर यांनी दिली.
Discussion about this post