व्हीएसआरएस न्युज नवी मुंबई, ठाणे, पुणे यांनी शासनाच्या निर्णयानुसार व्यावसायिक कबड्डी संघ स्थापन केलेला आहे. याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कबड्डी खेळ खेळण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करत आहे. त्यासाठी (दि. १२) रोजी आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत नगरसेवक प्रा उत्तम केंदळे यांनी व्यावसायिक कबड्डी संघ स्थापन करण्याला मंजुरी दिली.
क्रीडा स्थापत्य विभाग, संगीत अकादमी निर्णय, शहरातील सर्व क्रीडा मिळकती व सुविधा यासाठी कॅमेरे बसविण्याचे काम प्रस्तावित, खेलरत्न पुरस्कार, कबड्डी संघ, अत्याधुनिक व्यायाम शाळा, जलतरण तलाव, विविध खेळांची मैदाने, क्रिडा विद्युत, स्पर्धा परीक्षा केंद्र व सार्वजनिक वाचनालये क्रीडा विभागात समावेश करण्याचा निर्णय तसेच वरील अनेक विषयावर निर्णय घेण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्यात हॉकी चॅम्पियनशिप चे आयोजन करण्यात आले आहे. याचा फायदा येणाऱ्या २०२९ च्या ऑलिंपिक स्पर्धेत होणार आहे. जागतिकीकरणाच्या युगात उद्योग क्षेत्रात क्रीडा क्षेत्राने भरारी घेतली आहे. महिला खेळाडूंना आज पुरुषांच्या बरोबरीने संधी उपलब्ध करून दिली जात असून महापालिकेच्या व सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे महिला खेळाडूंचा सहभाग अलिकडच्या काळात वाढतांना दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी नगरसेवक शैलेश मोरे, नगरसेविका अश्विनी जाधव, नगरसेविका रेखा दर्शीले, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त क्रीडा सुषमा शिंदे, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे, जयश्री साळवे व इतर अधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post