व्हीएसआरएस न्युज मेवाडचे 13 वे राजे महाराणा प्रताप यांची जयंती आज संपूर्ण भारतात साजरी करण्यात येत आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार त्यांची जयंती ही 9 मे रोजी साजरी केली जाते. महाराणा प्रताप यांचा जन्म जेष्ठ मासच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथी मध्ये झाला होता. हिंदू तिथीनुसार त्यांची आज जयंती साजरी करण्यात येत आहे.
महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी एका राजपूत घराण्यात झाला.
त्यांचे वडील उदय सिंह द्वितीय हे मेवाड वंशांचे 12 वे राज्यकर्ते आणि उदयपूरचे संस्थापक होते. महाराणा प्रताप यांना तीन भाऊ आणि दोन सावत्र बहिणी होत्या.
महाराणा प्रताप यांना 11 पत्नी आणि 17 अपत्ये होती. महाराणा प्रताप यांच्यानंतर महाराणा अमर सिंह प्रथम हे त्यांचे उत्तराधिकारी बनले.
महाराणा प्रताप यांचा मृत्यू वयाच्या 56 व्या वर्षी झाला. 1597 साली शिकार करायला गेलेल्या महाराणा प्रताप यांचा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला.
Discussion about this post