व्हीएसआरएस न्युज पिंपरी मोहंम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त पिंपरी येथील सुल्ताने हिंद कमिटी तर्फे मिरवणूकचा प्रारंभ करून डिलक्स चौक, साई चौक, शगुन चौक, पिंपरी परिसरात काढण्यात आले.
मिरवणुकीद्वारे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिक मुस्लिम अनुयायी सहभागी होते. यंदाच्यावर्षी कोरोनाच्या नियमांमुळे नागरिक कमी दिसले.
इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठं महत्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन ‘ईद मिलाद उन-नबी’ म्हणून साजरा करण्यात येतो.
ईद मिलाद उन-नबीच्या दिवशी घरं आणि धार्मिक ठिकाणं आकर्षक रोषणाईनं सजवल्या जातात, प्रार्थना केली जाते. ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. या दिवशी हजरत मोहम्मद यांच्या पवित्र वचनांचं, कुराणाचं पठण केलं जातं.
इस्लाम कॅलेन्डरच्या तिसऱ्या महिन्यातील 12 तारखेला, इसवी सन पूर्व 517 मध्ये पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म झाला होता. सर्वात आधी हा सण इस्त्रायलमध्ये साजरा करण्यात येत होता. त्यानंतर अकराव्या शतकापासून जगभरात हा सण साजरा करण्यात येऊ लागला.
Discussion about this post