व्हीएसआरएस न्युज यंदा हजारो वर्षातून येणारा योग्य आला असून याला त्रुस्पर्श वंजूला महाद्वादशी असे म्हणतात. म्हणजे आज एकादशी आहे. द्वादशीही आहे. आणि त्रयोदशीही आहे. अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी ही काल सकाळी सव्वानऊ वाजता सुरु झाली. याला वारकरी संप्रदायात स्मार्त एकादशी म्हणतात. ही एकादशी आज सकाळी पावणे सात वाजता संपून द्वादशी लागत असली तरी सूर्याने पाहिलेली एकादशी ही आजची असल्याने वारकरी संप्रदायात अशा एकादशीनं भागवत एकादशी म्हणतात.
त्यामुळे आज वारकरी संप्रदाय या मोहिनी एकादशीचे व्रत करीत असतो.
सर्व एकादशी एका बाजूला आणि मोहिनी एकादशी एका बाजूला, एवढे मोठे पुण्य मोहिनी एकादशीचे धर्मशास्त्रात सांगितले आहे. प्रभू रामचंद्रांनी एकदा वसिष्ठ ऋषींना सीतेच्या विरहानंतर व्याकुळ होऊन मनाच्या शांती आणि समाधानासाठी एखादे व्रत सांगण्याची विनंती केल्यावर वसिष्ठ ऋषींनी रामाला ही मोहिनी एकादशी करण्यास सांगितले होते. देवाने समुद्र मंथनाच्या वेळी घेतलेले मोहिनीचे रूप याच दिवशी घेऊन अमृताचे वाटप केल्याची मान्यताही असल्याने या एकादशीला मोहिनी एकादशी या नावाने संबोधले जाते. अंतःकरणातील सर्व विषारी मोह माया यांची बंधने तोडणारी अशी ही मोहिनी एकादशी असते.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे भागवत संप्रदायातील लाखो वारकरी केवळ पंढरीची वारी करीत विठूरायाची उपासना आणि एकादशी करीत असतात. मोहिनी एकादशीस येणाऱ्या द्वादशीला देखील वारकरी संप्रदायात खूप मोठे महत्व असते. याच दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शी येथील भगवंत मंदिरात शेकडो वर्षांपासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होत असतो. एकादशीचा उपवास केल्यानंतर वारकरी द्वादशीच्या परण्याला म्हणजे उपवास सोडायला बार्शी येथील भगवंताच्या दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात. वारकरी संप्रदायातील जेष्ठ परंपरा असणारे बोधले घराणे गेल्या 11 पिढ्यांपासून भगवंत मंदिरात द्वादशीचे प्रकट कीर्तन सोहळा पहाटे चार ते सहा या वेळेत करीत असतो.
एकादशीचे व्रत न करणाऱ्याची अधोगती होते अशी भावना वारकरी संप्रदायात आहे. मोहिनी एकादशीला यंदा आलेला त्रुस्पर्श वंजूला महाद्वादशीचा दुर्मिळ योग शेकडो वर्षानंतर आल्याने आजच्या दिवसाला वारकरी संप्रदायात फार मोठे महत्व आहे.