व्हीएसआरएस न्युज पिंपरी कामगार क्षेत्रातील प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व व रा. स्व. संघाचे स्वयंसेवक हनुमंत लांडगे यांची भारतीय जनता पार्टी, कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रमुख तथा प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
पक्षाकडून त्यांना नुकतेच निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे. या निवडीबद्दल त्यांचा शहर भाजपकडून सत्कार करण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आमदार महेशदादा लांडगे, प्रदेश प्रभारी तथा मा. मंत्री रविंद्र चव्हाण, प्रदेश मार्गदर्शक संजय केनेकर, का. आ. प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे, कामगार नेते बबन झिंजुर्डे व आदीं गुरुतुल्य व्यक्तीमत्वाचे त्यांनी आभार मानले आहेत.
हनुमत नामदेव लांडगे यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे संस्थापक उपाध्यक्ष, मुख्यप्रवक्ता, कार्याध्यक्षा यापदासह २०० कोटी उलाढाल असलेल्या पिंपरी-चिंचवड मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन, ना नफा ना तोटा तत्त्वावर सुरु केलेल्या कामगार मेडिकलचे संस्थापक पदाधिकारी, कामगार वर्गणीतून उभारलेल्या ११ कोटीच्या कामगार भवनाचे संस्थापक आधारवड अशी अनेक पदे भूषविलेले लोकप्रिय कामगार नेते आहे.
निवडीबदल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुका वर्षाव…!
Discussion about this post