व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी साडेआठ टक्के सानुग्रह अनुदानाशिवाय २० हजार रुपये जादा बोनस म्हणून मिळणार आहे. अशा ५५ कोटी रुपयांच्या बोनसची घोषणा आयुक्तांनी सोमवारी केली. त्यानुसार क्लास फोरला किमान चाळीस हजार,तर क्लास वन अधिकाऱ्याला अडीच लाख रुपये बोनस मिळणार आहे.
२०२१-२२ या आर्थिक वर्षात महापालिका सेवेत कार्यरत असलेले व सध्या निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील सहा महिन्यांच्या कालावधीच्या निकषानुसार हा लाभ दिला जाणार आहे. सेवा निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांनासुद्धा याचा लाभ मिळणार आहे. बोनस व सानुग्रह अनुदानाची रक्कम सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळेल, याची दक्षता घ्यावी. त्याबाबतची बिले तयार करून तातडीने लेखा विभागाकडे सादर करावीत, असे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.
Discussion about this post