व्हीएसआरएस मराठी न्युज –आझमभाई पानसरे यांच्या प्राधिकरण, निगडी येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी अजित पवार गटाबरोबर गेलेले पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरे हे ही उपस्थित होते. पाटील यांनी पानसरे यांच्यासोबत चर्चा केली.
पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांनी नुकतीच शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली.
प्रकृतीच्या कारणामुळे ते काही महिने अज्ञातवासात होते. ते पुन्हा सक्रिय झाल्याने संभ्रमात असलेले शहरातील अनेक जण शरद पवार गटाचा मार्ग धरतील, असे चित्र आहे. त्यांच्या राजकीय अनुभवाचा लाभ राष्ट्रवादीच्या नव्या पदाधिकार्यांना होणार आहे.
शरद पवार यांच्या विचारांवर निष्ठा असणार्या लोकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शहरात पुन्हा ताकदीने उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची सोबत मिळाल्याने पक्षाला नवी ऊर्जा मिळणार आहे. तसेच, शहरातील अनेक नेते व पदाधिकारी पक्षात येण्यास इच्छुक आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले.
Discussion about this post