व्हीएसआरएस मराठी न्युज –वसंत मोरे यांच्या वाढदिवसाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लाल दिव्याची ॲम्बेसिडर गिफ्ट दिली आहे.
अखिल मोरे बाग मित्र मंडळाकडून वसंत मोरे यांना लाल दिव्याची ॲम्बेसिडर भेट देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. पुणे लोकसभेसाठी मनसेची चाचपणी सुरू आहे. पुणे लोकसभेसाठी मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे इच्छा व्यक्त केली आहे. जर पुणे लोकसभेसाठी मला उमेदवारी दिली तर नक्कीच आम्ही पुणेकरांचे प्रश्न सोडवू आणि पुणेकर भरभरून प्रेम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Discussion about this post