व्हीएसआरएस मराठी न्युज – दि.२७-श्योक नदीजवळून जाताना वाहन घसरून नदीत कोसळल्याने ही घटना घडली आहे. 7 जवानांच्या मृत्यूव्यतिरीक्त यामध्ये काही जण जखमी असल्याची देखील माहिती मिळतेय.
लडाखच्या तुरतुक परिसरातील श्योक नदीत हे वाहन कोसळलं आहे. यावेळी वाहनातून 26 जवान प्रवास करत होते. लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी नऊ वाजता लडाखमधील परतापूरमधून 26 जवानांना घेऊन एक गाडी हनिफ सब सेक्टरच्या फॉरवर्ड पोस्टकडे रवाना झाली. थॉईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर सैनिकांना घेऊन जाणारं वाहन रस्त्यावरून घसरलं आणि 50 ते 60 फूट खोल श्योक नदीत कोसळलं.
या घटनेनं सध्या देशभरातून हळहळ व्यक्त केली जातेय.
Discussion about this post