व्हीएसआरएस मराठी न्युज –महापालिकेचे सभागृहे, प्रेक्षागृहे, खेळांची मैदाने ही नागरिक, संस्था-संघटना, मंडळे व कंपन्यांना भाडेत्त्वावर दिले जातात. ते वापरताना शून्य कचरा (झिरो वेस्ट) कार्यप्रणालीचा अवलंब करणाऱ्यांना भाडेदरात १० टक्के सवलत देण्याचा निर्णय प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी घेतला.
महापालिका भवनात झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी वरील निर्णय घेतला. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप आदी यावेळी उपस्थित होते. महापालिका व स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विकास कामांविषयक सुमारे एक कोटी ६१ लाख रुपयांच्या खर्चास बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात यमुनानगर लाईट हाऊस प्रकल्पासाठी २९ लाख रुपये, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेच्या शस्रक्रिया विभागाच्या साहित्य खरेदीसाठी ५० लाख रुपये खर्चाचा समावेश आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये शहर संपूर्ण देशात अव्वल येण्यासाठी महापालिकेने शून्य कचरा कार्यप्रणालीवर भर दिला आहे. त्यामुळेच, महापालिका मालमत्ता भाडेदरात १० टक्के सवलत देण्यात आली आहे.
Discussion about this post