व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी – पिंपरी महापालिकेच्या वतीने आषाढी वारी पालखी सोहळ्याकरीता आयुक्त राजेश पाटील यांनी मुख्य समन्वक अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची नियुक्ती केली आहे.
पालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या कामकाजासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ संबंधित क्षेत्रीय कार्यालये आणि विभागांमार्फत उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी पालखी सोहळा कालावधीत येणाऱ्या भाविकांना सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतच्या कामकाजाचे नियोजन समन्वय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन करावे असे आदेशात नमूद केले आहे.
शहर अभियंता मकरंद निकम, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, बीआरटी व पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, माध्यमिक शिक्षण विभागाचे उप आयुक्त संदिप खोत, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, भांडारचे उपायुक्त मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. लक्ष्मण गोफणे, आकुर्डी रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, भोसरी रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा लोखंडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, प्रशासनचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात, सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधील स्थापत्य, विद्युत, जलनि:सारण, पाणीपुरवठा, स्थापत्य उद्यान खात्यांचे कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, प्रशांत पाटील, आबासाहेब ढवळे, विलास देसले, देवन्ना गट्टूवार, विजयकुमार काळे, अनिल राउत आदींचा नियंत्रण कामकाजात समावेश करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 21 जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आकुर्डी येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे.
Discussion about this post