व्हीएसआरएस मराठी न्युज -मुंबई सत्र न्यायालयाने एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा दिला आहे. एकनाथ खडसे यांच्यविरोधात ईडीने दाखल केलेल्या भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महसुल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता.
३.१ कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करत सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी पुण्यातील बंड गार्डन पोलिसांत खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
यापुर्वी खडसे यांना न्यायालयाने अंतरीम जामीन मंजुर केला होता. आजच्या सुनावणीत त्यांना मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयाने नियमित जामीन मंजुर केला आहे. एकनाथ खडसेंचे वकिल मोहन टेकावडे यांनी बाबतची अधिक माहिती दिली आहे.
Discussion about this post