व्हीएसआरएस मराठी न्युज –पालिका च्या वतीने ब्रिटीश डेप्युटी हाय कमिशन आणि सिनेक्स या ना-नफा संस्थेच्या भागीदारीत आज गुरुवार दि.१२ ऑक्टोबर २०२३ रोजी पिंपरी येथे कमी उत्सर्जन क्षेत्र कार्यशाळा आयोजित केली होती.
शहरातील प्रदूषण पातळी कमी करण्याच्या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारी संस्था, व्यवसायिक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच विविध भागधारकांच्या मदतीसह करण्यात आलेल्या आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहितीही आयुक्त सिंह यांनी दिली.
सेनेक्सचे स्टीव्ह कॅरोल यांनी ड्राफ्ट टुलकिट आणि शहर विशिष्ट कृती योजनेचा आढावा घेतला तसेच फायनल टूलकिटसाठी
अभिप्राय गोळा करणे आणि शहर विशिष्ट कृती योजना लागू करण्यासाठी येणारे अडथळे ओळखण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी मा. आयुक्त श्री. शेखर सिंह, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. विजय खोराटे, शहर अभियंता श्री. मकरंद निकम, उपायुक्त श्री. रविकिरण घोडके, सह शहर अभियंता श्री. संजय कुलकर्णी, श्री. प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता श्री. बापूसाहेब गायकवाड, ब्रिटिश उच्चायुक्तालयातील डॉ. नयनिका सिंग, अवनीश मल्होत्रा आणि हिरावती गोखले इ. उपस्थित होते.
Discussion about this post