व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -आज दिवगंत महापौर कै. भिकु वाघेरे पाटील यांच्या ३६ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास आमदार बनसोडे उपस्थित राहून कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
त्यांच्या स्मृती दिनानिमित्त भिकु वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तसेच मा. जवाहर कोटवानी यांनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना विशेष पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. आजच्या या कार्यक्रमास खासदार मा. श्री. श्रीरंग आप्पा बारणे, मा. महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री. अजित गव्हाणे, अतिरिक्त आयुक्त श्री. विकास ढाकणे, मा. नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे, मा. नगरसेवक राजू मिसाळ, मा. नगरसेवक श्री. डब्बू आसवाणी यांच्या सह समस्त पिंपरी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सहकार व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post