व्हीएसआरएस मराठी न्युज –निगडी- दि- २७ जुन २२( साेमवार) निगडीतील प्राधिकरण नियोजित महापाैर निवासासाठी राखीव असलेल्या माेकळ्या जागेच्या समाेरील राेडवर मध्यभागी चेंबरच्या बाजुलाच माेठ्ठे खड्डे पडले असुन हे खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत.
हा रहदारीचा रस्ता असुन या परिसरात ४ ते ५ शाळा आणि काँलेज आहेत. पावसाचे पाणी तुंबल्यामुळे हे खड्डे दिसुन येत नाहीत त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देवुन हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Discussion about this post