व्हीएसआरएस मराठी न्युज -फ क्षेत्रिय कार्यालय निगडी येथील नागरी सुविधा केंद्र चालक ह्यांना कोणत्याही प्रकारचा ठराव किंवा निविदा प्रक्रिया न राबवता थेट पद्धतीने जागा उपलब्ध करून देण्यात आली?
नागरी सुविधा केंद्र चालविण्यासाठी परवाना देण्यात आला आहे पण नागरी सुविधा केंद्र जागा उपलब्ध करून देण्यात यावी म्हणून पुणे जिल्हाधिकारी साहेब ह्यांनी कोणत्याही प्रकारची लेखी स्वरूपात माहिती पत्र देण्यात आले नाही फ क्षेत्रिय कार्यालय ही मालमत्ता पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांच्या मालकीच्या हक्काची असून नागरी सुविधा केंद्र व आधार कार्ड नोंदणी कार्यालय ह्यांना जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली नाही .
त्यांनी बेकादेशीर नागरी सुविधा केंद्र व आधार कार्ड नोंदणी कार्यालय विनापरवानगी चालू केले आहे. कायदेशीर परवानगी देण्यात आली नाही ह्याची दखल घेण्यात यावी तसेच महाराष्ट्र शासन व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्याची मालमत्ता असून त्या मालमत्ता संदर्भात भाडे करारनामा करण्यात आला नाही ह्या प्रकरणी गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात यावी सदर नागरी सुविधा केंद्र व आधार कार्ड नोंदणी कार्यालय बेकादेशीर सुरू असून कायदेशीर मान्यता नसल्याने कारवाई करण्यात यावी, तसेच भाडे वसूल करण्यात यावे ही मागणी सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते याःनी केली आहे.
Discussion about this post