व्हीएसआरएस मराठी न्युज –राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे, याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली.
भोसरी, लांडेवाडीतील राजमाता जिजाऊ कॉलेजमध्ये बुधवारी (दि.11) सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझमभाई पानसरे तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाचे सर्व माजी महापौर, माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
शरद पवार यांनी त्यांच्या 55 वर्षांच्या सामाजिक व राजकिय जीवनामध्ये काम करीत असताना आपल्या देशातील सर्वसामान्य नागरीक यांना केंद्रबिंदू मानून काम केलेले आहे. आपल्या देशात विविध जाती-धर्म, पंथांचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. सर्वधर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार व प्रचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोविण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा जश्ने ईद-ए-मिलन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे गव्हाणे यांनी सांगितले.
Discussion about this post