व्हीएसआरएस मराठी न्युज चिखली-मोरे वस्ती व म्हेत्रे वस्ती परिसरात प्रत्येक सोसायटीतील नागरिक या मोकाट कुत्र्यांमुळे त्रस्त आहेत.
शिवाय ही मोकाट कुत्री सोसायटी परिसरात घाण करतात, त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे काशिद यांनी निवेदनात नमूद केले आहे.
काशिद यांनी महापालिका आयुक्त आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
सद्यपरिस्थितीत शहराच्या विविध भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. या कुत्र्यांच्या टोळक्यांनी चांगलीच दहशत निर्माण केल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. महापालिका या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे, पण ही मोकाट कुत्री दिवसेंदिवस वाढतच आहेत़. रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून चालणे मुश्किल झाले आहे. दुचाकी घेऊनही निघाले तर मोकाट कुत्री पाठलाग करतात. यामुळे दुचाकीस्वारांचे अपघातही घडले आहेत. कुत्र्यांच्या झुंडी अंगावर धावून येतात.
मोकाट कुत्री पकडण्यासाठी श्वानवाहन, प्रशिक्षित मनुष्यबळ, नसबंदी खर्च व त्यानंतर देखभाल आदींवर महापालिका मोठ्या प्रमाणात खर्च करते. मात्र, आजची शहरातील कुत्र्यांची संख्या पाहून यातून महापालिकेने मोकाट कुत्र्यांवर केलेला खर्च पाण्यात गेला असेच म्हणावे लागेल. नागरिकांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही काशिद यांनी निवेदनात म्हटले आहे.
Discussion about this post