व्हीएसआरएस मराठी न्युज -भोसरी बस स्टॉप यमुनानगर कॉर्नर येथून मधुकर पवळे उड्डाणपूल खाली पार्किंग मध्ये बी आर टी बस स्टॉप ह्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावा अशी मागणी समाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पी एम पी एल मुख्य अधिकारी ओमप्रकाश बकोरिया साहेब ह्यांना ईमेल करुन तक्रार केली आली, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांना ईमेल करुन तक्रार दाखल करण्यात आली .
भोसरी बस स्टॉप यमुनानगर कॉर्नर येथून मधुकर पवळे उड्डाणपूल खाली बी आर टी बस स्टॉप पाठीमागे हलविण्यात यावा म्हणून पी एम पी एल मुख्य अधिकारी बकोरिया साहेब ह्यांच्या कडे मागणी करण्यात आली निगडी यमुनानगर कॉर्नर येथून भोसरी मार्गे चाकण भोसरी देहू गाव आळंदी मरकळ शिंदे वासुली म्हाळुंगे हडपसर ह्या ठिकाणी पी एम पी एल बस जात असून रोज हजारो प्रवाशी ह्या ठिकाणी प्रवास करत असून त्या ठिकाणी बस स्टॉप येथे प्रवाशांना निवारा शेड बांधण्यात आले नसून शालेय विद्यार्थी जेष्ठ नागरिक महिला वर्ग ह्यांना ऊन वारा पाऊस ह्या तीन ऋतू मध्ये तासनतास बस ची वाट पाहावी लागत आहे..
निगडी येथील भोसरी बस स्टॉप ह्या ठिकाणी रस्त्यावर रिक्षा तासनतास उभ्या करून अवैध प्रवासी वाहतूक गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असून वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे फुटपाथवर टपरीधारक ह्यांनी अतिक्रमण केले आहे .
प्रवाशी बांधवांना रस्त्यावर भोसरी बस स्टॉप ह्या ठिकाणी बस येण्याची वाट पाहावी लागत आहे ,तर दुसरीकडे भोसरी मार्गे निगडी यमुना नगर कॉर्नर ह्या ठिकाणी बस स्टॉप उपलब्ध नाही त्यामुळे मधुकर पवळे उड्डाणपूल खाली पार्किंग मध्ये बी आर टी बस स्टॉप ह्या ठिकाणी भोसरी निगडी बस स्थानक स्थलांतर करण्यात यावे ही मागणी सचिन काळभोर यांनी पि एम पी एल चिंचवड शहर आधिकारी यांना केली.
Discussion about this post