व्हीएसआरएस मराठी न्युज -कोविडच्या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत आषाढी वारी पालखी सोहळा झाला नाही. मात्र, यावर्षी अत्यंत उत्साहाने राज्यभरातील वारकरी या भक्तीच्या मेळ्यात सहभागी झाले आहेत.
जगदगुरु संत तुकाराम महाराज च्या पालखी सोहळ्यात मागील २३ वर्षा पासुन लढ्ढा परिवार गंगा अपार्टमेंट , विवेकनगर, आकुर्डी येथे अन्नदानाचा उपक्रम राबवत आहे, या वर्षी ३००० वारकऱ्यांनी लाभ घेतला तसेच त्यांना तुलसी वृंदावन,२५ किलो तांदूळ व मेडिकल किट देण्यात आले.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश सांस्कृतीक मंडळ, तरुण मित्र मंडळ व गंगा अपार्टमेंट मधील रहावासीयांनी सहकार्य केले.कार्यक्रमासाठी मा. नगरसेवक उल्हास शेट्टी,चिपळूण बँक चे संचालक श्री.मोहन मिरगल, पांडुलाल सोनी, मुरलीधर सारडा, प्रसन्न राठी, सागर सारडा व माहेश्वरी समाजातील सर्व कार्यकर्ते. या सर्व कार्यकमाचे थेट प्रक्षेपण कलर्स मराठी वाहिनी वर दाखवण्यात आले.
लढ्ढा परीवार तर्फे मोठ्या भक्तीभावाने वारकऱ्यांची सेवा केली. यासह पिंपरी-चिंचवडकरांना प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावे, अशी प्रार्थनाही केली.
Discussion about this post