व्हीएसआरएस मराठी न्युज अक्रम शेख प्रतिनिधी –
बुलडाण्याचे माजीआमदार हर्षवर्धन सपकाळ यांची कन्या डॉ. गार्गी हर्षवर्धन सपकाळ यांनी दि. २ एप्रिल २०२२ रोजी शनिवार ला सैलानी दर्ग्याला भेट देऊन सैलानी येथे राहत असलेल्या मनोरुग्णांची पाहणी करून त्यांच्याशी चर्चा केली. या मनोरुग्णावर आरोग्य उपचार करण्यासाठी परिवर्तन ट्रस्ट बुलडाणा येथील मातृभूमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रुग्णावर प्रत्येक महिन्याला त्यांची तपासणी करून त्यांना औषधोपचार केला जाईल अशी माहिती देण्यात आली.
यावेळी त्यांच्यासोबत बुलडाणा तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष सुनील तायडे, बुलडाणा पंचायत समिती सदस्य चांद मुजावर, बुलडाणा तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष किशोर साखरे, भगवान गायकवाड, विठ्ठल सोनवणे उपस्थित होते.
Discussion about this post