व्हीएसआरएस मराठी न्युज चिखली-चिखली परिसरात रविवारी रात्री ही घटना उघडकीस आली. मुलाचा मृतदेह एका पडक्या घरात आढळून आल्याने, परिसरात खळबळ उडाली आहे.
लक्ष्मण देवासी (वय 08, रा. हरगुडेवस्ती, चिखली, मुळगाव राजस्थान) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मुलाचा अंत्यसंस्कार करणार नाही, अशी मागणी सुमारे एक हजार मारवाडी समाजाचे लोक जमून न्यायाची मागणी करत आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन वायसीएम येथे करण्यात आले आहे. मात्र आजतागायत नातेवाईकांनी मृतदेह घरी नेला नाही. पोलिसांनी संशयावरून 4 जणांना ताब्यात घेतले आहे. चौकशी चालू आहे. मारवाडी समाज (राजस्थानी) कुटुंबासह न्यायासाठी याचना करत आहेत. मृताच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान असून त्यातून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
Discussion about this post