व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी (ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
हनुमान जन्मोत्सव निमित्त हजेरी मारुती मंदिरात पहाटे ह.भ.प.पांडुरंग महाराज कदम यांचे कीर्तन झाले.संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात,मंदिरा लगत काळा मारुती,इंद्रायणी नदी काठी शनी- मारुती या विविध ठिकाणी ही हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
महाअभिषेक, पूजा व प्रसादाचे आयोजन ही यावेळेस करण्यात आले होते.सकाळीच या विविध ठिकाणी दर्शनासाठी नागरिकांची गर्दी केली होती.
हजेरी मारुती मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.मंदिरात आकर्षक फुलसजावट ही करण्यात आली होती.हनुमानाच्या डोक्याच्यावरती शोभेसा चांदीचा मुकुट ही ठेवण्यात आला होता .ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिर जीर्णोद्धार विधी व होम हवन सकाळी ८ ते ११ पर्यंत संपन्न झाला.या मंदिराचा जीर्णोद्धार शुभारंभ आमदार दिलीपअण्णा मोहिते पा. व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हजेरी मारुती मंदिरात ह.भ. प.पांडुरंग महाराज कदम यांचा श्रीफळ ,शाल देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आळंदी नगरपरिषदेतील माजी पदाधिकारी वर्ग व आळंदीतील नागरीक उपस्थित होते.नवशिवशक्ती तरुण मंडळ,श्री हजेरी मारुती मंदिर समिती,समस्त आळंदीकर ग्रामस्थ या आयोजकांच्या वतीने हजेरी मारुती जीर्णोद्धार शुभारंभ कार्यक्रम पार पडला.
Discussion about this post