व्हीएसआरएस मराठी न्युज – संत संखाराम महाराज पालखी सोहळ्यातील भाविकांसाठी विश्व श्रीराम सेना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शन खाली आरोग्य तपासणी व औषधी वाटप केळी वाटप बिस्किट पाणी वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
त्या वेळी आरोग्य तपासणीसाठी डॉ अनिरुद्ध टोणगावकर, सचिव आयएमए पीसीबी,डॉ विकास मंडलेचा
कोषाध्यक्ष IMA PCB,ललितकुमार धोका डॉ
आयएमए पीसीबीचे उपाध्यक्ष,दीपाली टोणगावकर
IMA pcb, कार्यकारी समिती सदस्य,डॉ विजय सातव, माजी अध्यक्ष इमा पीसीबी, अध्यक्ष पीसीडीए,डॉ श्रीमती झामरे, पीसीडीए,गणेश भोईर सचिव पीसीडीए, डॉ
पृथ्वीराज चव्हाण, सचिव पीसीडीए,
डॉ सौ स्वप्नाली झोका, डॉ सौ सोनाली सातव,
घनवट, खजिनदार पीसीडीए ,डॉ संजीव दात्ये, माजी अध्यक्ष आयएमए पीसीबी
डॉ प्रशांत जीवतोडे, ipp, PCDA यांच्या मार्गदर्शन लाभले.
आकुर्डी येथील मुक्काम संपवून सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी सायंकाळी आकुर्डीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात मुक्कामी पोचला होता. रात्री पालखी तळावर कीर्तन झाले. त्यानंतर जागर झाला. सोमवारी (ता. १२) पहाटे पाच वाजता सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, त्यांच्या पत्नी ईशा सिंह यांच्या हस्ते मंदिरात पादुकांची महापूजा झाली. काकड आरती झाली. त्यानंतर सोहळा मार्गस्थ झाला.
दत्तवाडी आकुर्डीत कार्यक्रमासाठी विश्व श्रीराम सेनाचे निरज शाही, प्रमोद गुप्ता डॉ पंकज गुप्ता ,राहुल गुप्ता, शाम गुप्ता, रोहीत प्रासाद आरोग्यमंच अध्यक्ष अक्रम शेख यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post