व्हीएसआरएस मराठी न्युज –भाजपा ओबीसी युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा निमित्ताने AIM फॉर सेवा आश्रम सोनवणेवस्ती रोड, चिखली या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत टी-शर्ट वाटप करण्यात आले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा( दिनांक 17 सप्टेंबर 2022 – 2 ऑक्टोबर 2022) कार्यक्रमानिमित्त तसेच देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व भारतरत्न, मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती याचे निमित्ताने
दि. 02 ऑक्टोबर 2022 रोजी भारतीय जनता पार्टी ओबीसी युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने AIM for सेवा स्वामी दयानंद सरस्वती अखिल भारत सेवा अभियान अनाथ आश्रम* सोनवणेवस्ती रोड, चिखली या ठिकाणी अनाथ विद्यार्थ्यांना मोफत टी-शर्ट वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष ऋषिकेशभाऊ रासकर, भाजपा ओबीसी युवा मोर्चा शहराध्यक्ष राजेशभाऊ डोंगरे, सरचिटणीस नितीन साळी, आश्रमाचे संचालक व्यवस्थापक श्री.जयेश फटांगळे सर, कुमार रासकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष ऋषिकेश भाऊ रासकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आश्रमातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राजेशभाऊ डोंगरे यांनी केले. सरचिटणीस प्रा. नितीन साळी सर यांनी केले.
तसेच चंद्रकांत सूर्यवंशी सरांनी आभार मानले.
Discussion about this post