व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांची गुरुवारी (दि. २९) पदोन्नती करण्यात आली आहे. तब्बल दोन महिने रिक्त असलेल्या या पदावर प्रशासनाने अखेर, अधिकारी नियुक्त केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
‘आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय हे ३१ जुलै २०२२ ला सेवानिवृत्ती झाले. तेव्हापासून हे पद रिक्त होते. त्यांच्या दालनात आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर बसत आहेत. डॉ. रॉय हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी तत्काळ नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आयुक्त राजेश पाटील यांची अचानक बदली झाल्याने डॉ. साळवे यांच्या पदोन्नतीचा निर्णय मागे पडला. अखेर, नवीन आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांच्या पदोन्नतीला हिरवा कंदील दाखविला. त्यांची अखेर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. दरम्यान, या पदावरून डॉ. रॉय व डॉ. साळवे यांच्या उच्च न्यायालयात दावा सुरू होता.
Discussion about this post