व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -आगामी पालिका निवडणुकीत योगेश बहल निवडणूक प्रभारी आणि मुख्य प्रवक्ता म्हणून काम पाहणार आहेत.
विशेष म्हणजे, बहल यांच्या निर्देशानुसार, शहर राष्ट्रवादीच्या संघटनेत मोठे बदल करण्यात आले. नगरसेवक अजित गव्हाणे यांना शहराध्यक्षपद आणि महिला शहराध्यक्षपदी कविता आल्हाट यांची निवड करण्यात आली. या निवडीमागे आणि शहरातील जातीय गणिते बसवण्यात योगेश बहल यांचा सहभाग महत्त्वपूर्ण राहिला आहे.
भाजपातील नाराज नगरसेवकांचे राष्ट्रवादीत होणारे प्रवेश केवळ नव्या कार्यकारिणीच्या घोषणेच्या प्रतीक्षेत थांबवले आहेत. प्रभाग रचना करताना राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे. प्रभाग रचनेची स्थानिक धुरा योगेश बहल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या प्रभाग रचनेत गावकी-भावकीचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आला. विशेष म्हणजे, स्वपक्षीय विरोधकांसह भाजपा आणि शिवसेनेतील मातब्बरांची गोची करण्यात योगेश बहल यशस्वी झाले आहेत. २०२४ मध्ये आपल्या विचारांचे आमदार शहरातील तीनही मतदार संघात असावेत आणि शहराची लीडरशीप आपल्या मुठीत ठेवण्यासाठी २०२२ मधील पायाभरणी करण्यात योगेश बहल यशस्वी होताना दिसत आहेत.
शहराध्यक्ष गव्हाणे यांच्यासोबत समन्वयक व मुख्य प्रवक्ता योगेश बहल, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनीही पदभार स्वीकारला. पार्टी कार्यालयाच्यावतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. सर्वांनी शहराध्यक्ष गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने काम करण्याचा निश्चय केला.
Discussion about this post