व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दि 25 डिसेंबर 1927 रोजी महाड याठिकाणी विषमतावादी मनुस्मृतीचे सार्वजनिक दहन केले होते.
त्या पार्श्वभुमीवर पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मनुस्मृतीच्या प्रतिमेचे प्राथमिक दहन करण्यात आले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दि 25 डिसेंबर 1927 रोजी महाड याठिकाणी विषमतावादी मनुस्मृतीचे सार्वजनिक दहन केले होते. या प्रसंगाचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भिमसृष्टी मध्ये समावेश न केल्याने मागील 3 वर्षांपासून याकामी मनपाकडे पाठपुरावा सुरु असून मनपा जोपर्यंत या मनुस्मृती दहन प्रसंग भिमसृष्टी म्युरल्स मध्ये समाविष्ट करणार नाही तोपर्यंत दरवर्षी दि 25 डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन करून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
मनुस्मृती दहन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे विषमतावादी व अमानवीय अश्या मनुस्मृतीचे सार्वजनिक दहन केले होते.
जेष्ठ विचारवंत मानव कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम, मारुती भापकर , नरेंद्र बनसोडे, प्रकाश जाधव ,आनंदा कुदळे , ॲड. लक्ष्मण रानवडे , सतिश काळे , डॉ. मनीषा ताई गरुड, सुरेश गायकवाड, संतोष जोगदंड ,धनाजी येळकर ,धम्मराज साळवे, प्रवीण कदम, गिरीश वाघमारे, यांच्या समवेत व इतर ही सर्व पुरोगामी संघटना व मान्यवर सहभागी झाले.
Discussion about this post